हळवलच्या परबवाडीत उद्या 9 एप्रिलला श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन....!
हळवल परब वाडी कै. भागोजी झिलू परब समाज मंदिर येथील वार्षिक उपक्रम...
कणकवली | प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातल्या हळवल परब वाडी येथील कै. भागोजी झिलू परब समाज मंदिर येथे शनिवारी, दि. ९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
सत्यनारायण महापूजेचे औचित्य साधून पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ एप्रिल २०२२ सकाळी १० वा: श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२:३० वा: आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ३ते ४ वा: महिलांचा फुगडी कार्यक्रम, सायं. ४ ते ७ वा: खेळ पैठणीचा, रात्रौ ७ ते ९ वा. : स्थानिक ग्रामस्थांची सुस्वर भजने, रात्रौ ९:३० वा. : सिध्देश्वर दशावतार नाट्य मंडळ, दोडामार्ग यांचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग ” मलकेश्वर लिंग स्थापना ”
जास्तीतजास्त भाविकांनी या महापूजेचा,तिर्थ प्रसादाचा व संपूर्ण सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन हळवल परबवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)