उन्हाचा वाढता पारा…भारनियमन आवरा..!
भारनियमन विरोधात हळवल व वागदे ग्रामस्थ खवळले..!
कणकवली | प्रतिनिधी : सकाळी ५ ते दुपारी २ व सायंकाळी ७ ते रात्री १२ यावेळेत भारनियमन करण्याचा निर्णय महावितरण विभागाने घेतल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. गर्मीच्या दिवसात हा निर्णय घेतल्याने हळवल व वागदे ग्रामस्थानी आक्रमक होत महावितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला टाळे असल्याने आक्रमक ग्रामस्थांनी विद्युत उपकेंद्र नियंत्रण कक्षाला धडक दिली. कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करत अधिकारी येत नाही तो पर्यंत इथून न हलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणताही लेखी आदेश नसून केवळ वर्गवारी नुसार भारनियमन करण्यात आले असल्याची माहिती महावितरण कर्मचाऱ्यांनी दिली. यावेळी हळवल, वागदे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)