भाजप तालुका प्रमुखांच्या हस्ते तहसिलदारांना निवेदन...!
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी..!
चिंदर | विवेक परब : एप्रिल महिन्यामध्येच झालेला अवकाळी पाऊस, वादळी वा-यामुळे आंबा, काजू, कोकम, जांभूळ या पिकांचे झालेले नुकसान तसेच काही ठिकाणी दुकाने, घरे, शेतमांगरांचे झालेले नुकसान या सर्वांचे पंचनामे करुन शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी भारतीय जनता पार्टी मालवण तालुक्याच्यावतीने तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते मालवण तहसिलदार यांना आज निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाबँक संचालक बाबा परब, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मालवण माजी नगरसेवक गणेश कुशे, संतोष गांवकर, प्रफुल्ल प्रभू इ. उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)