ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीत उड्डाण पुलाच्या अपुऱ्या कामामुळे अपघात घडला तर जबाबदारी घेणार कोण ?

कणकवलीत उड्डाण पुलाच्या अपुऱ्या कामामुळे अपघात घडला तर जबाबदारी घेणार कोण ?

प्रकाशन: 18 Aug 2021 07:00 PM
वाचन संख्या 56

कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने सवाल

कणकवली / उमेश परब – कणकवली शहरात ज्यादिवशीपासुन उड्डाण पुल वाहतुकीसाठी खुले केले, त्या दिवशीपासुन काही ना काही घडतेय. अनेक पक्षांनी अनेक निवेदने दिली,पण याची आजपर्यंत कोणीही दखल घेतलेली नाही. यामुळे आज अशी परिस्थिती उद्भवली आहे की, उड्डाण पुलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत , तसेच जाणवलीपासूनचे उड्डाण पुल खचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद केले आहे .आगामी गणेश चतुर्थी उत्सवात वहातूक करायची कशी ? एकतर्फी मार्ग सुरू असल्यामुळे वाहतूककोंडी होणारच … अशातच अपघात घडलाच आणि जिवीत हानी झालीच , तर याची जबाबदारी घेणार कोण ? असा सवाल कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने कणकवली प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आला आहे याबाबतचे निवेदन तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप मांजरेकर व राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी सादर केले. राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर,कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर ,निलेश तेली ,बंटी मेस्त्री, प्रवीण वरूणकर ,सौ . गौरी महेश तेली ,महेश तेली,अमृता जिलेश मालंडकर, निलेश मालंडकर ,परेश एकावडे ,अक्षय घाडीगावकर व कणकवली तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हे निवेदन निवेदन दिले. कणकवली शहरातील सर्व्हिस रोडच्या बाजूने अजुनही गटारे अर्धवट स्थितीत आहेत तसेच काही ठिकाणी गटारांचे बांधकाम कोसळले आहे . तसेच गटारांच्यावरच पादचारी व्यवस्था केलेली आहे , पण ती लोकांना चालण्यासाठी आहे की मोटरसायकल पार्कीगसाठी आहे, तसेच दुकानांचे बोर्ड लावण्यासाठी आहे का ?असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.आम्ही चालायचे कुठुन आणि म्हणुनच जनता रस्त्याचा वापर चालण्यासाठी करत आहे . एकतर तुमचा सर्व्हिस रोड मोठ्या गाड्या जाण्या लायकदेखील नाही. मग येणाऱ्या श्री . गणेश चतुर्थी उत्सवात घाई गडबडीत जर एखाद्याच्या हातुन अपघात घडलाच आणि यात जीवित हानी झाली , तर याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित केला आहे .याबाबतचे निवेदन कणकवली तहसीलदार ,कणकवली पोलिस स्टेशन व कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स