ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
निराधारांच्या पुनर्वसानासाठी कणकवलीकर एकवटले..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

निराधारांच्या पुनर्वसानासाठी कणकवलीकर एकवटले..!

प्रकाशन: 05 Apr 2022 03:42 PM
वाचन संख्या 85

जीवन आनंद संस्था,पोलिस निरिक्षक हुंदळेकर,कणकवली पोलिस ठाणे व सजग नागरीकांची जनजागृती फेरी.

शिरगांव | संतोष साळसकर : समाजातील निराधार, मतिमंद आणि दुर्लक्षित ज्येष्ठ यांची संख्या कमी करण्यासाठी तसेच अशा व्यक्तींना माणूस म्हणून जगण्यासाठी काय करता येईल हे केवळ बोलण्याचे व लिहीण्याचे घटक नसून त्यावर प्रत्यक्ष जनजागरण आवश्यक आहे या उद्देशाने पणदूर येथील जीवन आनंद संस्था, कणकवली पोलीस ठाणे व आम्ही कणकवलीकर यांच्या माध्यमातून शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, सहाय्यक गटविकास अधिकारी सूर्यकांत वारंग, जीवन आंदन संस्थेचे संदीप परब, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर, सचिव रवींद्रनाथ मुसळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ विद्याधर तायशेटे डॉ सहास पावसकर व्यापारी संघाचे सदस्य, संदीप परब, ज्येष्ठ नागरिक संघाचे दादा कुडतरकर, सचिव रवींद्रनाथ मुसळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ सुहास पावसकर, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर नगरसेविका मेघा गांगण, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर, जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी, संजय मालंडकर, काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर, निवृत्त मंडळ अधिकारी नामदेव जाधव, कलमठचे माजी सरपंच निसार शेख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे विजय भोगले, आचरेकर प्रतिष्ठानच्या सदस्या लीना काळसेकर, विजय गांवकर, सुप्रिया पाटील, माजी नगरसेवक उमेश वाळके, प्रसाद अंधारी, बडू खोत, राजा राजाध्यक्ष, शशांक बेळकर, प्रिया सरुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. ही जनजागृती फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आप्पासाहेब पटवर्धन चौक आणि पुढे बाजारपेठमार्गे झेंडा चौक ते पटकी देवी मंदिर अशी काढण्यात आली. या फेरीत अंगणवाडी सेविका, सामाजिक संस्थांचे सभासद पोलीस कर्मचारी महिलांसह नागरिक सहभागी झाले होते. या फेरीत सहभागी झालेल्यांनी निराधारांच्या पुनर्वसनासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले. यावेळी फिरवण्यात आलेल्या दान पेटीत अनेकांनी आप आपल्या परीने मदत देखील केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स