सनराईज सामाजिक संस्था मालवण आणि पळसंब ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन.
चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील पळसंब येथे सनराईज सामाजिक संस्था,मालवण आणि पळसंब ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कै.भगवान वरक व कै.दादा.राऊत यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 8 एप्रिलला सकाळी 9 ते दुपारी 1 दरम्यान हा आरोग्यासाठी अत्यावश्यक उपक्रम संपन्न होत आहे . पळसंबच्या जयंती देवी मंदिरजवळ हे शिबीर भरविण्यात आले आहे. या शिबिरासंबंधी अधिक माहितीसाठी तुषार चव्हाण (9405736920) आणि अमित पुजारे (9420405914) या क्रमांकावर संपर्क साधायचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिरात जास्तीतजास्त नागरीकांनी रक्तदान करुन पुण्यदानाचा हा शिबीर सोहळा यशस्वी करावा असे आवाहन पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)