ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कणकवलीत कंटेनरला अपघात.

कणकवलीत कंटेनरला अपघात.

प्रकाशन: 02 Aug 2021 10:11 AM
वाचन संख्या 144

कणकवली | उमेश परब : गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर कणकवली तालुक्यातील जानवली पुलाजवळील हॉटेल बावरच़ी समोर महामार्गाच्या डिवाईडर वर चढत उलटल्याने कंटेनर चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. हा अपघात नेमका कसा घडला हे जरी समजले नसले तरी कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर डिवाईडर वर चढल्यामुळे पलटी झाला असावा अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात पलटी झालेल्या कंटेनर खाली चालक अडकल्याने चालकाचा कमरेखालील भाग अक्षरशः छिन्नविछिन्न झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कणकवली वाहतूक पोलीस संदेश आबिटकर, वैभव कोळी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर पलटी झालेला तो कंटेनर हटविण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स