भारत देशाचे माजी सैनिक हे आमचा अभिमान : नितेश राणे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना आमदार नितेश यांनी मोफत दाखवला 'द काश्मीर फाईल्स!'
कणकवली | प्रतिनिधी : भारत देशावरचे देशप्रेम काय असते आणि देशाप्रती समर्पित भावना कशा असाव्यात हे देशाच्या तिन्ही सैन्य दलातील सैनिकांकडून शिकावे.देशासाठी सर्व काही पणाला लावून प्रत्येक युद्धात लढलेल्या माजी सैनिकांचे योगदान फरमोठे आहे.हे सैनिक देशाची शान तर आहेतच त्याच प्रमाणे आम्हा सर्वांचा ते अभिमान आहेत.देशाच्या या खऱ्या संपप्तीचा येणाऱ्या प्रत्येक पिढीने आदर,मानसन्मान ठेवला पाहिजे असे प्रतिपादन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले.भाजपा आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून “द कश्मीर फाईल्स” चित्रपट माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत दाखविण्यात आला.यावेळी १९६५ आणि १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा आमदार नितेश राणे बोलत होते.यावेळी माजी सैनिक कणकवली संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष उर्फ नाना मुसळे,जिल्हा समन्वयक चंद्रशेखर जोशी,पतसंस्था महासंघाचे सचिव धनंजय राऊळ,उपाध्यक्ष धोंडीराम सावंत व निलेश परब, सचिव दत्तगुरू गावकर,मुख्य सल्लागार रविन्द्र पाताडे, दिनकर परब,ऑगस्टीन लोबो, महादेव तावडे,संतोष चव्हाण, मंगेश देसाई ,,सतिष भोसले, सदानंद सावंत,याच्या सह माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री युवक जिल्हा सचिव संदीप मेस्त्री, चित्रपट मंदिर व्यवस्थापक राजू मल्हार,आदी उपस्थित होते.आमदार नितेश राणे म्हणाले, द कश्मीर फाईल्स चित्रपट माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांना दाखविणे या मागील उद्देश त्यावेळी वस्तुस्थिती काय होती आणि त्यावेळी आपल्या सैनिकांनी त्या काश्मीर मध्ये कसे काम केले होते.आज खूप परिस्थिती बदलली आहे.सरकार आणि प्रशासन भक्कम असल्याने आज दिसणारी स्थिती आणि पूर्वी ची परिस्थिती यातील फरक आपल्याला कळेल.आम्ही सोशल मीडियाच्या जमान्यात राहतो मात्र ज्या जमन्याय सैनिकांनी काम केले ,देशाचे काश्मीरच्या सीमेवर उभे राहून रक्षण केले तो काळ कसा होता आणि तेव्हा त्यांनी अशा बिकट परिस्थितीत काम केले होते म्हणून आम्ही सुरक्षित होतो. ही वस्तुस्थिती तुम्ही जाणून घ्या आणि माजी सैनिकांचा आदर करा.आजचा सत्कार हा या माजी सैनिकांच्या ऋणातून उतराई होणासाठी आहे.तुमचा हक्काचा आमदार म्हणून तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी तत्पर आहे.देशाचे केंद्रीय उदयोग मंत्री नारायण राणे साहेब आपल्या सोबत आहेत.सैनिकांचा प्रत्येक प्रश्न आपण मोदी सरकार च्या माध्यमातून सोडवू असे आश्वासन यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले.दम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संतोष राऊळ यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपट सर्वांनी पहावा असे सांगितल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार व त्यांचे कुटुंबीयांना चित्रपट निर्मिती दाखविला होता. आज माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना हा चित्रपट मोफत दाखविला गेल्याने आमदार नितेश राणे यांच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)