आणि गतिरोधक हटला…!
सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी इफेक्ट…!
कणकवली | प्रतिनिधी : कणकवली तालुक्यातील कळसुली – हळवल मार्गावर गरज नसताना जो गतिरोधक होता तो आता हटवला गेला आहे . गतिरोधकाचे ते स्थान अपघात प्रवण नव्हते शिवाय त्याचा उंचवटा अनियमीत होता.
त्यावर निर्देशन म्हणून पांढर्या पट्ट्याही नव्हत्या. या सर्व घटकांमुळे या मार्गावरील वाहनचालकांच्या व प्रवाशांच्या जीवालाही धोका होता असे सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने माध्यमांना कळविले होते.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला होता . माध्यमांतून सुशांत दळवी यांचा हा इशारा प्रसारित होताच काही तासातच ही कार्यवाही झालेली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन.