बांदा मंडल भाजपा सावंतवाडीच्या वतीने स्वस्थ बालक बालिका स्पर्धा अभियाना अंतर्गत सशक्त मुलांना प्रमाणपत्र वितरण.
बांदा | राकेश परब : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व लोकनेते देवेन्द्र फडणवीस, चंद्रकांत पाटील (प्रदेशाध्यक्ष) भाजप महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वामधून ,स्वस्थ बालक बालिका अभियान व भारत – आगामी 21 मार्च ते 27 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 दरम्यान राष्ट्रीय स्वस्थ बालक-बालिका अभियान सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या व मंडलाच्या अंगणवाडी व बुथ स्तरावर यशस्वीपणे राबवला गेला.
हा उपक्रम भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदा मंडल मध्ये इन्सुली जि. प. शेर्ले गावात मळगांवकर वाडी मध्ये पाच आंगणवाडीचा एकत्रित संपन्न झाला.
केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वस्थ स्वयंसेवक अभियान अंतर्गत स्वस्थ बालक बालिका अभियान हे संपूर्ण देशात २१ मार्च ते २७ मार्च या कालावधीत आयोजित करावे असे सर्व राज्यांना कळविले होते परंतु महाराष्ट्रात राज्य सरकार ने कोरोनाचे कारण सांगून अभियानच रद्द केले म्हणूनच भाजपाच्या वतीने घेण्यात आले असे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद कामत म्हणाले कि ० ते ६ वयोगटातील मुलांची उंची व वजन या निकषावर स्वस्थ बालकांना प्रमाणपत्र व “POSHAN APP” (पोषण ॲप)द्वारे नोंद केली जाणार असून कुपोषित बालकांना केंद्र सरकार कडून सकस आहार पोचवण्याचीही सोय होईल.
यावेळी कार्यक्रमाला बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, शेर्ले सरपंच उदय धुरी, बूथ अध्यक्ष शामराव सावंत, बूथ अध्यक्ष अजित शेर्लेकर, भाजपा कार्यकर्ते विराज नेवगी, डॉ वराडकर, नर्स बाई, आशा, पाच आंगणवाडी सेविका, मदतनीस, बालक, बालिका आणि पालक उपस्थित होत्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)