ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पाताडे मामांच्या कुटुंबियांना मालवण क्रिकेट खेळाडू व क्रिकेटप्रेमींतर्फे मदत सुपूर्द.

पाताडे मामांच्या कुटुंबियांना मालवण क्रिकेट खेळाडू व क्रिकेटप्रेमींतर्फे मदत सुपूर्द.

प्रकाशन: 02 Apr 2022 06:19 PM
वाचन संख्या 106

मालवण | विनित मंडलिक : मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडचे मुख्य क्युरेटर तथा माळी श्री पांडुरंग पाताडे ऊर्फ पाताडे मामा यांचे अकाली निधन झाले होते. त्यानंतर मालवण क्रिकेट प्रेमी,खेळाडू यांनी पाताडे मामांच्या कुटुंबियांप्रती संवेदना म्हणून एकत्रीत योगदानातून आर्थिक मदत करायचे ठरवले. ती मदत मामांच्या पत्नी आणि मुलीकडे आज 2 एप्रिलला सायंकाळी पाताडेमामांच्या वायरी येथील निवासस्थानी जाऊन दिली गेली.

यावेळी मालवण तालुक्यातील निखील परब,मंदार गावडे,प्रसाद राणे,गोविंद ऊर्फ बंटी केरकर,सुशील शेडगे ,सुयोग पंडित, वैभव सावंत यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील क्रिकेट खेळाडू क्रिकेटप्रेमींतर्फे पाताडे मामांच्या कुटुंबियांना सुपूर्द केली गेली. मालवण तालुक्यातील क्रिकेट समूह व गुड माॅर्निंग क्रिकेट संघ यांच्या तर्फे प्रामुख्याने या मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

पाताडे मामांच्या कुटुंबियांना अजूनही कोणी मदत करु इच्छित असेल तर श्री. निखिल परब ‘9168191957’ या गुगलपे क्रमांकावर अथवा श्री.पिंकू मोरे,मालवण यांच्याकडे जमा करायचे विनम्र व कळकळीचे आवाहन मालवण तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना,खेळाडुंना व दानशूर व्यक्ती व संस्थांना उपस्थित सर्वांनी केले आहे. ज्यांनी आत्तापर्यंत यथाशक्ती मदत केली त्यांचे आभारही पाताडे मामांच्या पत्नी व मुलीकडून मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स