ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कुडाळामध्ये 'मधुभाई एक उन्हातले चांदणे' अक्षरसोहळा संपन्न..

कुडाळामध्ये 'मधुभाई एक उन्हातले चांदणे' अक्षरसोहळा संपन्न..

प्रकाशन: 29 Mar 2022 03:29 PM
वाचन संख्या 63

मधुभाईंची उपस्थिती ठरली विशेष आकर्षण…

चिंदर | विवेक परब : ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांच्या ‘कोकणी ग वस्ती,करुळचा मुलगा,सूर्यफूल, भाकरी आणि फूल,संधीकाल,जुईली,माझा गांव माझा मुलुख’ ह्या पुस्तकांतील काही अंशांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कोमसाप सिंधुदुर्गने हा अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यात अनुक्रमे सुरेश ठाकूर,ऊषा परब,आनंद वैद्य,वृंदा कांबळी, विठ्ठल कदम,अरुण मर्गज,मंगेश मसके, धडाकेबाज कवी व साहित्यिक रुजारिओ पिंटो यांनी भाग घेतला.

“वयाच्या दहाव्या दशकात पदार्पण करताना माझ्याच साहित्यकृतिने माझे केलेले अभिष्टचिंतन हे अलौकिक बाब होती माझ्यासाठी.अश्या संकल्पना आरती प्रभूंनाच सुचत असे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी भारावून जाऊन सांगितले.

‘चांदणे उन्हातले ‘ ही मूळ संकल्पना विठ्ठल कदम यांची होती. कोमसाप मालवणचे अध्यक्ष आणि साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी सांगितले की सर्व अभिवाचकांनी आपल्या अभिवाचनाचे एक एक सोनचाफ्याचे फूल ज्या वेळी मधुभाईच्या ओंजळीत वाहीले आणि त्या वेळी मधुभाई भारावूनच गेल्याचे उपस्थित सर्वांना जाणवले.

कार्यक्रमाची पूर्वतयारी मंदार मसके आणि कोमसाप युवाकार्यकर्ते कुडाळ यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुरेश ठाकूर यांच्या खास “ठाकूर शैलीत” झाल्याने कार्यक्रमात रंगत आल्याची उपस्थित रसिकांची प्रतिक्रिया होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स