ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधु रक्तमित्रच्या पत्रलेखन स्पर्धेत प्रफुल्ल माने सर्व गटात प्रथम ; ३७७ स्पर्धक होते सहभागी.

सिंधु रक्तमित्रच्या पत्रलेखन स्पर्धेत प्रफुल्ल माने सर्व गटात प्रथम ; ३७७ स्पर्धक होते सहभागी.

प्रकाशन: 29 Mar 2022 02:27 PM
वाचन संख्या 76

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” या रक्तदान चळवळीत कार्यरत असणार्‍या शासन नोंदणीकृत संस्थेने आयोजित केलेल्या “रक्तदान, देहदान, अवयवदान” विषयी पत्रलेखन स्पर्धेत प्रफ्फुल माने (डोंबिवली) यांनी सर्व गटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. उर्वरित निकाल पुढील प्रमाणे आहे. (खुला गट)
प्रथम – किरण सावंत (कणकवली)
द्वितीय – सुकांती पालकर (वैभववाडी),
तृतीय – गीता लळीत (देवगड),
उत्तेजनार्थ प्रथम – शीतल गवस (तळकट),
उत्तेजनार्थ द्वितीय – श्रृती गोगटे (वायंगणी- मालवण),
उत्तेजनार्थ तृतीय – स्वाती खैरकर (रामटेक, नागपूर).
पाचवी ते सातवी
प्रथम – हर्षिता गावडे (आरवली),
द्वितीय – विधी चिंदरकर (कणकवली),
तृतीय – वैष्णवी हावळ (माडखोल),
उत्तेजनार्थ प्रथम- अक्षरा नाईक (केरवडे),
उत्तेजनार्थ द्वितीय – केतकी आंबेरकर (जामसंडे),
उत्तेजनार्थ तृतीय – मानसराज गवस (वाफोली).
आठवी ते दहावी
प्रथम- वैदैही सावंत (नाटळ),
द्वितीय- नेहा पाटील (जामसंडे),
तृतीय- नेहल परब (खानोली),
उत्तेजनार्थ प्रथम – श्रद्धा पोईपकर (पोईप),
उत्तेजनार्थ द्वितीय- सुदिप्ता तेली (जामसंडे),
उत्तेजनार्थ तृतीय – श्रृतिका जुवलेकर (उभादांडा).

या बक्षिसांचे वितरण सिंधुनगरीमध्ये सल्लागार उद्धव गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ आचरेकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, सहसचिव रविकांत चांदोस्कर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजयकुमार जोशी, एकनाथ चव्हाण, वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेश पडवळ, कुडाळ-वेंगुर्ला संघटक यशवंत गावडे, देवगड तालुका सचिव प्रकाश जाधव, सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे उपस्थित होते.

मरणोत्तर देहदानाचा संकल्प केलेल्या श्रीमती लळीत यांच्या शुभहस्ते ऐच्छिक रक्तदान चळवळीचे जनक डाॅ. जे.जी. जाॅली आणि रक्तगट संशोधक डाॅ. कार्ल लॅन्डस्टीनर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन तसेच मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी कोरोना संक्रमणाच्या काळातही “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान”ने जिल्ह्यातील तिनही रक्तपेढ्यांना रक्ताची कमतरता भासू दिली नाही, नियमित रक्तदान शिबिरे आयोजित करुन रक्तपेढ्यांना भरपूर रक्तपुरवठा उपलब्धकरुन दिला, एवढेच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील तथा राज्याबाहेरील रक्तपेढ्यांमार्फत सुद्धा रक्तदान शिबिरे आयोजित करुन त्यांनाही रक्तपुरवठा करुन दिला. हे सर्व करतानाच शिबिरात येऊन तसेच हाकेला प्रतिसाद देऊन रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या आगळ्यावेगळ्या पत्रलेखन स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्र भरातून प्रचंड प्रतिसाद लाभला आणि त्यामध्ये एकूण ३७७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.

प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी प्रतिष्ठानच्या अनेक सदस्य व कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक करतानाच अनेकांच्या नावाचा उल्लेख करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. तसेच जास्तीतजास्त रक्तदान शिबिरे भरविणारा देवगड तालुका, वर्षभरात रक्तदान शिबिरांचा पाऊस पाडणारा सावंतवाडी तालुका, रक्तदान शिबिरात उच्चांक गाठणारा वैभववाडी तालुका तसेच केवळ महिन्याभरातच रक्तदान शिबिराद्वारे जिल्ह्याच्या टोकापर्यंत गावागावांत पोहोचणारा दोडामार्ग तालुका या सर्वांचीही अत्युत्कृष्ठ कार्याबद्दल प्रशंसा केली, तर बाॅम्बे ब्लडग्रुपच्या बाबतीत जगाच्या तुलनेत श्रीमंत असणार्‍या मालवण तालुक्याप्रती सुद्धा सार्थ अभिमान व्यक्त केला. त्याचप्रमाणे गावोगावी-खेडोपाडी प्रत्येक व्यक्तीला रक्तदानाविषयी जाणीवजागृती व्हावी, रक्तदान चळवळ घराघरांत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही पत्रलेखन स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले व विजेत्या स्पर्धकांचे कौतुकही केले. याबरोबरच थॅलेसेमिया या आजाराविषयी विस्तृत मार्गदर्शन करतानाच या आजाराची जिल्ह्यात असलेली तेरा मुले ही त्यांना नियमित रक्तपुरवठा करण्यासाठी दत्तक घेतल्याचे सांगितले.

यावेळी विजयकुमार जोशी, प्रकाश जाधव, तर विजेत्यांमधून तेली, पाटील या मुली तसेच सावंत सर, लळीत मॅडम, शीतल गवस, नीता सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्धवजी गोरेकाका यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंतवाडी तालुका सचिव श्री. बाबली गवंडे यांनी केले तर आभार कुडाळ-वेंगुर्ला संघटक श्री. यशवंत गावडे यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स