ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवगडसह संपूर्ण जिल्ह्यात युवासेनेकडून आदित्य ठाकरेंचे आरदातिथ्य ;युवासेनेत चैतन्य.

देवगडसह संपूर्ण जिल्ह्यात युवासेनेकडून आदित्य ठाकरेंचे आरदातिथ्य ;युवासेनेत चैतन्य.

प्रकाशन: 28 Mar 2022 08:14 PM
वाचन संख्या 46
Article image

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यांनी देवगड हापूस आंब्यांचा हाराने केले स्वागत..!

Article image

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह शेकडो युवासैनिकांच्या वतीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे देवगड येथील कुणकेश्वर तिठा एमटीडीसी नजीक ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी सुशांत नाईक यांनी देवगड हापूस आंब्यांचा हार घालत सन्मानचिन्ह भेट देत त्यांना शुभेच्छा दिल्या.आजच्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे युवासेनेमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.आदित्य ठाकरेंचा विजय असो…कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला…शिवसेना झिंदाबाद अशा घोषाणां देत परिसर दणाणून सोडला.दरम्यान, देवगडात आदित्य ठाकरे यांचा दौरा असलेल्या मार्गावर सुशांत नाईक यांच्या वतीने स्वागताकरिता कमाणी उभारण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावून हा परिसर भगवामय करण्यात आला होता. तर आदित्य ठाकरे यांचे देवगड येथील कुणकेश्वर तिठा एमटीडीसी येथे स्वागत केल्यावर तेथून नियोजित कार्यक्रम स्थळी ठाकरे यांच्या सोबत युवासेनेच्या कार्याकर्त्यांचा ताफापुढे मार्गस्थ झाला.यावेळी खास विनायक राऊत, आम.वैभव नाईक,संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,शिवसेना नेते संदेश पारकर,नगरसेवक कन्हैया पारकर, कणकवली शहर प्रमुख आदित्य सापळे,देवगड प्रमुख सौरभ माने,उपशहर प्रमुख कणकवली सोहम वाळके,अमित मयेकर,विभाग प्रमुख सिद्धेश राणे,खारेपाटण विभाग प्रमुख तेजस राऊत,आकाश गुरव,गणेश वाळके,शरद सरंगले,आबु सेस्त्री,संजय सावंत, सचिन आचरेकर,परेश आचरेकर,भूषण कोळसुलकर,रोहित रावराणे,सिद्धेश माणगावकर,भूषण परुळेकर,रिमेष चव्हाण,गणेश गांवकर,दिनेश वाळके, विनय हडकर,फरिद काझी आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स