ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदरमध्ये 'सोसायटी आपल्या दारी…जनसेवेची रित न्यारी..!'

चिंदरमध्ये 'सोसायटी आपल्या दारी…जनसेवेची रित न्यारी..!'

प्रकाशन: 28 Mar 2022 10:18 PM
वाचन संख्या 401

चेअरमन सिताराम हडकर आणि सहकार्यांचा अपडेटेड उपक्रम..!

चिंदर | विवेक परब : चिंदरच्या श्री. रामेश्वर विकास सेवा. सोसा.लि. चिंदर या संस्थेच्या नविन कार्यकारणीने “विकास सोसायटी आपल्या दारी…” या अभियानाची आज चिंदर बाजार, खरीवाडी, नागोचीवाडी, पडेकाप, अपराजवाडी, कोंडवाडी अशा शेतकरी ग्रामस्थांनची सभा घेऊन आपल्या नूतन कार्यकालाची जोरदार सुरवात केली.

या अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना सभासद करुन घेणे, त्यांना शेतीसाठी कर्ज पुरवठा करणे, संस्थेचे जे सभासद मृत आहेत त्यांची वारस नोंद करणे व या विषयावर मार्गदर्शन करणेसाठी गावातील प्रत्येक वाडीमध्ये सभा घेण्याचे संस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे याचा आज शुभारंभ झाला.

यापुढे पालकरवाडी, गावठणवाडी, भटवाडी, सडेवाडी अशा सभा घेण्यात येतील.

आजच्या सुरूवातीच्या सभांना सोसायटी चेअरमन सिताराम हडकर, व्हाईस चेअरमन सुनिल पवार, कार्यकारीणी सदस्य दिगंबर जाधव, विश्वास खरात, आबा पारकर, सुरेश साटम, सोसायटी सचिव कविंद्र माळगांवकर, कृषी, मित्र दयाळभाऊ अपराज, संतोष अपराज, पिंट्या अपराज, शशीकांत सावंत, सर्वैश अपराज, अनिल पडवळ, दिपक खोत, दत्तात्रय घाडी, सावंत व बहुसंख्य शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

चिंदरमधील श्री रामेश्वर विकास सोसायटी लिमिटेडच्या या अभियानामुळे बहुतांश चिंदर वासियांना ‘विकास सोसायटी आपल्या दारी..’ हा उपक्रम ‘जनसेवेची रित न्यारी’ वाटल्याची चर्चा आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स