ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे डागमोडे येथील  जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मालवणचा महापुरुष रेवतळे संघ विजेता..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे डागमोडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मालवणचा महापुरुष रेवतळे संघ विजेता..!

प्रकाशन: 28 Mar 2022 12:59 AM
वाचन संख्या 41

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने व नवतरुण मित्र मंडळ डागमोडे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये मालवणच्या महापुरुष रेवतळे संघाने यंग स्टार कणकवली संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या महापुरुष रेवतळे संघाला रोख रुपये १०००० आणि चषक तर उपविजेत्या यंगस्टार कणकवली संघाला रोख रुपये ५००० आणि चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

तृतीय क्रमांक जय महाराष्ट्र संघ सावंतवाडी, चतुर्थ क्रमांक जय मानसीश्वर वेंगुर्ले याना प्रत्येकी रोख रुपये दोन हजार आणि चषक प्रदान करण्यात आला. स्पर्धेतील बेस्ट रायडर शिवलिंग पाटील कणकवली, बेस्ट डिफेंडर कीर्तीयश परब मालवण, स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू भक्तीयश साळगांवकर वेंगुर्ला याना गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना युवा नेते संदेश पारकर आणि आमदार वैभव नाईक, सिने अभिनेत्री प्राजक्ता वाडये यांच्या उपस्थितीत पार पडले. पंच म्हणून तुषार साळगांवकर, नितीन हडकर, दाजी रेडकर, अमित गंगावणे, किशोर पाताडे, प्रथमेश सावंत, हेमंत गावडे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी नवतरुण मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, उद्योजक संदेश ठाकूर, पोलीस पाटील सोमा ठाकूर, कामगार नेते हरी चव्हाण, रमेश ठाकूर, प्रकाश ठाकूर, अनिल ठाकूर, महेश ठाकूर, बुधाजी ठाकूर, अमित ठाकूर, स्वप्नील ठाकुर, समीर ठाकूर, पंकज ठाकूर, देविदास ठाकुर, गुरुनाथ ठाकूर, ओमकार ठाकूर, किशोर ठाकूर, सुभाष ठाकूर, बाळप्रकाश ठाकूर, प्रशांत चव्हाण, रमेश चव्हाण, परशुराम ठाकूर, कमलेश ठाकूर, रवी ठाकूर, परशुराम रामचंद्र ठाकूर, दादा डागमोडेकर, मंगेश ठाकूर, राजेंद्र ठाकूर, सौरभ ठाकूर, बंटी ठाकूर, संजय ठाकूर, सुभाष ठाकूर आणि नाव तरुण मंडळांचे सर्व सदस्य उपस्थित होते. स्पर्धेतील सर्व चषक कै. शिवाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ उद्योजक संदेश ठाकूर, छोटू ठाकूर यांनी पुरस्कृत केले होते.सूत्र संचालन श्री. दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स