ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डागमोडे ग्रामस्थ व शेतकरी यांच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्न करत रहाण्याचे आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डागमोडे ग्रामस्थ व शेतकरी यांच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्न करत रहाण्याचे आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन .

प्रकाशन: 28 Mar 2022 12:54 AM
वाचन संख्या 44

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : डागमोडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य लाभणार असून यापुढेही येथील उर्वरित विकास कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. येथील रस्ता आणि शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असा धूपप्रतिबंधक बंधारा प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासनही आमदार वैभव नाईक यांनी मसुरे येथे बोलताना दिले . मसुरे डागमोडे येथे श्री देव रवळनाथ मंदिर येथील श्री देवी भवानी मातेच्या गोंधळा निमित्त आमदार वैभव नाईक यांनी सदिच्छा भेट दिली होती. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी डागमोडे मधील विविध विकासात्मक प्रश्न मार्गी लावले होते या बाबत आमदार वैभव नाईक आणि मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.यावेळी बोलताना युवा नेते संदेश पारकर म्हणाले आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास शिवसेनेच्या माध्यमातून आज होत आहे. आमदार वैभव नाईक यांचे कार्य कर्तुत्व आज संपूर्ण जिल्ह्यासाठी भूषण वाह आहे. येथील सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटीबद्ध आहे. यावेळी सिने अभिनेत्री प्राजक्ता वाडये बोलताना म्हणाली हे गाव म्हणजे माझे आजोळ असून आज येथील सर्व ग्रामस्थांनी, नवतरुण मंडळाने जो माझा सत्कार केला हा सत्कार माझ्या जीवनातील अविस्मरणीय असा प्रसंग आहे. मी कितीही पुढे गेली तरी या गावाला विसरणे शक्य नाही. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गार्गी ठाकूर, पूजा ठाकूर, राज्य कबड्डी असोसिएशनचे दिनेश चव्हाण, नितीन हडकर, प्राजक्ता वाडये यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते संदेश पारकर, प्राजक्ता वाडये, शिवसेना तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर,सरपंच संदीप हडकर, शिवसेना युवा नेते पंकज वर्दम, उपसरपंच राजेश गावकर, पप्पू मुळीक, छोटू ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य गायत्री ठाकूर, पूजा ठाकूर, गार्गी चव्हाण, बाळ प्रकाश ठाकूर, शिवाजी ठाकूर, मोहन ठाकूर, पत्रकार प्रफुल्ल देसाई, बाळा आंग, बाबू आंग, व्यंकटेश ठाकूर, पांडूरंग ठाकुर, संदेश ठाकूर, सोमा ठाकूर, हरी ठाकूर, रमेश ठाकूर, प्रकाश ठाकूर,ओमकार ठाकूर, अनिल ठाकूर, महेश ठाकूर, बुधाजी ठाकूर, अमित ठाकूर, स्वप्नील ठाकुर, समीर ठाकूर, पंकज ठाकूर, देविदास ठाकूर, गुरुनाथ ठाकूर, राजेंद्र ठाकूर, महेश ठाकूर, किशोर ठाकूर, सुभाष ठाकूर, प्रशांत चव्हाण, रमेश चव्हाण, परशुराम ठाकूर, कमलेश ठाकूर, रवी ठाकूर, दादा डागमोडेकर, मंगेश ठाकूर, सौरभ ठाकूर, संजय ठाकूर आणि नवतरूण मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ प्रकाश ठाकूर, प्रास्ताविक शिवाजी ठाकूर व आभार श्री. दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स