सिंधुदिनांक
२८ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना
इ.स. १७३७ साली थोरले बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर स्वारी करून मुघलांचा पराभव करून मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केलं.
सन १९१० साली फ्रेंच देशाचे वैमानिक व संशोधक हेन्री फॅब्रे यांनी फॅब्रे हायड्राविओन हे पहिले सागरी विमान उडविले.
इ.स. १९३० साली तुर्कस्तानमधील अंगारा आणि कॉन्स्टँटिनोपल या शहराची नावे बदलून अंकारा आणि इस्तंबुल ठेवण्यात आले.
सन १९४१ साली नेताजी सुभाष चंद्रबोस इंग्रज शासनाच्या नजर कैदी पासून स्वत:चा बचाव करून बर्लिन येथे पोहचले.
इ.स. १९४२ साली रास बिहारी बोस यांनी जापानची राजधानी टोकियो येथे ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ ची स्थापना केली.
सन १९७९ साली अमेरिकेतील हॅरिसबर्गजवळील पेनसिल्व्हेनिया येथील डॉफिन काउंटीमध्ये स्थित असलेल्या थ्री माईल बेट अणुउत्पादक स्टेशनच्या अणुभट्टीतील थ्री माईल आयलँडचा अपघात होऊन अणुभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती होऊ लागली.
इ.स. १९९८ साली ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्यूटिंग‘ कंपनीने विकसित केलेला आपला ‘परम-१००००’ हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)