त्या दोन आरोपींना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी
कणकवली / उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरो चीफ)- संतोष परब हल्ला प्रकरणातील फरार दोन आरोपी अखेर कणकवली पोलीस स्थानकात हजर झाले होते. ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवनुरे आणि धीरज व्यंकटेश जाधव अशी आरोपींची नावे असून दोघांनाही आज कणकवली दिवाणी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी १० दिवसाची पोलिस कोठडी मागितली होती मात्र आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर दोन्ही आरोपींना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)