ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
चाफेड  भोगलेवाडी  येथील श्री गायगोठण गणपती मंदिरात  रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.

चाफेड  भोगलेवाडी  येथील श्री गायगोठण गणपती मंदिरात  रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.

प्रकाशन: 25 Mar 2022 02:33 PM
वाचन संख्या 120

शिरगांव |‍ संतोष साळसकर : वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही. रक्ताचा प्रश्न सतत भेडसावत असतो. रुग्णांना रक्ताची गरज असली की कुटुंबीय सैरभैर होतात. तसेच संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना सारख्या संकटा वेळी अनेक जणांना रक्ताच्या तुडवड्यामुळे प्राण गमवावे लागले .अश्याच संकटाच्यावेळी रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून देवगड तालुक्यातील  चाफेड भोगलेवाडी येथील श्री गाय गोठण गणपती मंदिर  देवस्थान कमिटी आणि वाडीतील ग्रामस्थ मंडळ व युवा वर्ग यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन २४ मार्च  रोजी करण्यात आले होते . 

या शिबिराला  रक्तदात्यांचे  उत्तम असे सहकार्य आणि प्रोत्साहन लाभले .

मोठ्या प्रमाणात युवा आणि तरुण उत्साही रक्त दात्यानी रक्त दान करून समाजाप्रती असणारी बांधिलकी जपत रक्त दानासारखे श्रेष्ठ दान करण्याचे कर्तव्य पार पाडले.  या कार्यक्रमास   विशाल  विष्णू सावंत आणि नीलिमा विशाल सावंत यांचे सहकार्य लाभले तरी देवस्थान कमिटी च्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले  कार्यक्रमा वेळी गाय गोठन गणपती मंडळाचे अध्यक्ष  पंढरीनाथ कांडर , उपाध्यक्ष महेश भोगले , सचिव तथा माजी सरपंच  सत्यवान भोगले , खजिनदार  सत्यवान कांडर , चाफेड गावाचे प्रथम नागरिक  सरपंच सौ. संचीता भोगले ,  पोलिस पाटील संतोष सावंत , विजय भोगले,प्रियांका भोगले आणि आरोग्य विभाग कर्मचारी वर्ग तसेच वाडीतील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स