ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
संतोष परब हल्ला प्रकरणातील मुख्य दोन आरोपी आरोपींना अटक ; आज न्यायालयासमोर करणार हजर.

संतोष परब हल्ला प्रकरणातील मुख्य दोन आरोपी आरोपींना अटक ; आज न्यायालयासमोर करणार हजर.

प्रकाशन: 25 Mar 2022 12:40 AM
वाचन संख्या 115

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली येथील शिवसैनिक संतोष परब यांच्या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवणुरे (३४ ), धीरज व्यंकटेश जाधव (३६, दोन्ही रा.पुणे) असे दोन आरोपी कणकवली पोलीस ठाण्यात काल स्वतः हजर झाले. पोलिसांनी त्यांना रितसर अटक करत वैद्यकीय तपासणी केली असून प्राथमिक चौकशी केली जात आहे.

या प्रकरणात दोन्ही आरोपींना शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक कालावधीतच शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवलीत त्यांना झाला होता. हे प्रकरण राज्यात गाजले होते, याप्रकरणी आमदार नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्यासह अन्य आरोपींना यापूर्वीच अटक झाली आहे. आतापर्यंत दोन आरोपी वगळता सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती, दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान, गुरुवारी कणकवली पोलिस ठाण्यात या प्रकरणातील मुख्य संशयित ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवणुरे (३४ ), धीरज व्यंकटेश जाधव (३६, दोन्ही रा.पुणे) हे दोन आरोपी फरार होते. आता मात्र ते स्वतःहून हजर झाले. ताबडतोब पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे.

त्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून प्राथमिक चौकशी कणकवली पोलीस करत आहेत. याप्रकरणी या दोन्ही आरोपींना उद्या कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे,अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी ११ आरोपींची नावे निश्चित करण्यात आली आहेत.त्यापैकी १० आरोपींना अटक करण्यात झाली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर करीत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स