ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विलवडेत पारंपारिक संस्कृती आणि धार्मिक प्रथा जोपासणारा शिमगोत्सव उत्साहात साजरा

विलवडेत पारंपारिक संस्कृती आणि धार्मिक प्रथा जोपासणारा शिमगोत्सव उत्साहात साजरा

प्रकाशन: 25 Mar 2022 12:45 AM
वाचन संख्या 36

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विलवडे गावात पारंपरिक लोककला व संस्कृती आणि धार्मिक प्रथा – परंपरा वैशिष्ट्य पूर्णरित्या जोपासत सात दिवशीय शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विलवडे गावातील होळीच्या ठीकाणी मानकरी , ग्रामस्थ, सर्व भाविकांनी तसेच युवकांपासून आबालवृद्धानी ढोल ताशांचा गजरात धुळवड साजरी केल्यानंतर एकमेकांना रंग लावून होळी सण उत्सवाचा आनंद लुटला.

Article image

गावात आजही आपल्या जेष्ठांच्या व गाव मानकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावचे धार्मिक रीतीरिवाज , संस्कृती व परंपरा याचे जतन करीत आहे. दरवर्षी ७ दिवस चालणारा उत्सव यावर्षी दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर मोठ्या उत्साहात संपन्न झाला . बुधवारी सायंकाळी होळी कडे नारळ ठेवून गा-याणे घालणे. घोडेमोडणी, नारळ तोंडणी आदि कार्यक्रमात उत्साहात साजरे झाले. त्यानंतर ‘ धूळवड ‘ साजरी करण्यात आली. पिपळेश्वर येथे होळीचा नारळ तोडणी केल्यानंतर नदीवर स्नान करुन शिमगोत्सवाची सांगता झाली. गुरुवारी सकाळ पासून संध्याकाळ पर्यत ‘न्हावान’ देण्यांचा कार्यक्रम झाला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स