ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदा तेरेखोल नदीत बुडलेल्या तरुणाचा आत्महत्या की घातपात याची चौकशी सुरु..

बांदा तेरेखोल नदीत बुडलेल्या तरुणाचा आत्महत्या की घातपात याची चौकशी सुरु..

प्रकाशन: 25 Mar 2022 12:24 AM
वाचन संख्या 26

बांदा | राकेश परब: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीपात्रात बुधवारी सकाळी अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगत्या स्वरुपात आढळून आला. बांदा पोलीसांनी शेर्ले ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह पाण्याबाहेर काढला. बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी शवविच्छेदन करुन सदर इसमाचा मृत्यू ५ दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त केला.

तेरेखोल नदीपात्रात शेर्ले गावाच्या बाजूने काहीतरी वस्तू पाण्यात तरंगत असल्याचे बांद्यातील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब यांना दिली. त्यांनी शेर्ले सरपंच उदय धुरी यांच्याशी संपर्क करुन मृतदेह किंवा अन्य काही वस्तू आहे का याबाबतची खात्री करण्याची विनंती केली. सरपंच उदय धुरी यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह तरंगत असल्याचे सांगितले. त्यानंतर बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर क्षेत्रात खोल पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडचणी आल्या. अखेर होडीच्या सहाय्याने पोलीस कर्मचारी विजय जाधव, प्रशांत पवार, तातू कोळेकर, चंद्रकांत देसाई मार्गदर्शनाखाली पोलीसांनी शेर्ले ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी शवविच्छेदन केले. पाच दिवसांपूर्वी सदर इसमाचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुरुष जातीचा ३५ ते ४० वयोगटातील सदर तरुण असल्याचा अंदाज व्यक्त केला. बांदा पोलीसात बेपत्ता फिर्याद नसल्याचे पोलीसांनी सांगितले. सिंधुदुर्ग व गोव्यात कोणी बेपत्ता आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर तरुण परप्रांतीय असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. आत्महत्या की घातपात याबाबत बांदा पोलीसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे. आपल्या परिसरात कोणी बेपत्ता असेल तर पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन बांदा पोलीसांकडून करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स