ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
हृदय शस्त्रक्रियेसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानकडून रक्तदान..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हृदय शस्त्रक्रियेसाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानकडून रक्तदान..!

प्रकाशन: 25 Mar 2022 12:19 AM
वाचन संख्या 76

बांदा | राकेश परब : सात-आठ वर्षांपूर्वी अपंगत्व आलेल्या मुटाट-देवगड येथील विजय सीताराम घाडी वय ४६ यांना गोवा बांबोळी हॉस्पिटल येथे हृदय शस्त्रक्रियेसाठी रक्तदात्यांची गरज होती. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे रक्तदाते साईस्वरूप देसाई व सुनिल गावडे यांनी गोवा येथे जाऊन रक्तदान केले.

Article image

तसेच या केससाठी मित्तल देसाई (तांबोळी, सावंतवाडी) व एक स्थानिक रक्तदाते हे सुद्धा गोवा येथे रक्तदान करण्यास गेले होते, मात्र काही तांत्रिक कारणास्तव ते दोघे रक्तदान करू शकले नव्हते. चार रक्तदाते पाहिजे होते, पण दोघे रक्तदान करु शकायला अपात्र झाले म्हणून पेशंटची पत्नी अस्वस्थ झाली आणि नुकतेच रक्तदान केलेल्या साईस्वरुप देसाई यांना आपली व्यथा बोलून दाखविली.

त्यावेळी साईस्वरुप देसाईने त्यांना धीर दिला आणि केवळ रक्तदान करुनही स्वस्थ न बसता त्याने रात्रभर धडपड करुन आपल्या एका मित्राला आणि भाच्याला पहिल्यांदाच रक्तदानासाठी प्रेरीत केले आणि रक्तदान करवून घेतले .

मेल्किऑर परेरा, सावंतवाडी यांनी केवळ एकविसाव्या वर्षी पहिल्यांदाच तर अनिकेत खानोलकर रा. केर, ता. दोडामार्ग यांनी अठ्ठाविसाव्या वर्षी पहिल्यांदाच रक्तदान केले. वरील दात्यांच्या अमूल्य रक्तदानामुळे घाडी कुटुंबीयांनी आभार मानले आहेत. रूग्णांच्या नातेवाईकांनी सिंधुमित्र रक्त प्रतिष्ठान चे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स