माणगांव हायस्कूलच्या वैष्णवी सावंत हिला राज्यस्तरीय युथ स्पर्धेत सिल्वर मेडल.
चिंदर | विवेक परब : चिपळूण डेरवण येथे झालेल्या युथ स्पर्धेत माणगांव हायस्कूलच्या वैष्णवी सावंत हिला राज्यस्तरीय युथ स्पर्धेत सिल्वर मेडलसह दुसरा क्रमांक पटकावला.
800 मीटर धावणे स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातून 150 स्पर्धक सहभागी झाले होते.त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 50 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात माणगांव मधून 4 स्पर्धकांनी भाग घेतला होता यात माणगाव बंदिचेमाड येथील वैष्णवी सावंत हिने सिल्वर मेडल घेत दुसरा क्रमांक पटकावला.
या विद्यार्थ्यांना माणगांव हायस्कूलचा माजी विद्यार्थी आणि खेळाडू भिवा म्हाडेश्वर व सौ जागृती म्हाडेश्वर हे प्रशिक्षक होते.त्यांचेही पालकांनी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)