सुप्रसिद्ध डाॅक्टर सिद्धेश सकपाळ करणार ज्येष्ठ नागरीकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन.
चिंदर | विवेक परब : ‘बदलती जीवनशैली, ऋतुंमधील बदल, वाढते तापमान आणि आरोग्याची काळजी’ ह्या महत्वपूर्ण विषयावर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
सदर मार्गदर्शन वर्ग बुधवार दि. 30 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजी न्यू इंग्लिश स्कूल आचरे येथे संध्याकाळी 4 ते 6 ह्या वेळेत संपन्न होणार आहे. यावेळी डॉ. सिद्धेश सकपाळ हे सर्व ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी आचरे पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सदर मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा. आपल्या सोबत आपल्या कुटुंबियांनाही सदर मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेण्यास सांगावे असे आवाहन बाबाजी भिसळे (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे) यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या मार्गदर्शन शिबिरासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन मार्फत ज्येष्ठांसाठी कोणत्या योजना उपलब्ध आहेत, त्यांच्यासाठी कोणते संरक्षक कायदे आहेत या विषयी मान. कुलदीप पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक आचरे पोलीस स्टेशन) हे देखील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)