ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे डागमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी मातेचा वार्षिक गोंधळ उत्सव दि. २५ मार्च रोजी.

मसुरे डागमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी मातेचा वार्षिक गोंधळ उत्सव दि. २५ मार्च रोजी.

प्रकाशन: 23 Mar 2022 11:27 PM
वाचन संख्या 67

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : परंपरेने व संस्कृतीने दारूबंदीचा पुरस्कर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसुरे डागमोडे येथील जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ मंदिरातील श्री भवानी मातेचा प्रसिद्ध असा वार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवार दि. २५ मार्च रोजी साजरा होणार आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळपासून धार्मिक विधींना प्रारंभ होणार असून रात्री विधिवत पूजाअर्चा, देव स्वारी तरंग सोहळा, ओट्या भरणे, नवस बोली आणि नवसफेड, महाप्रसाद, गोंधळ विधी आणि विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी या उत्सवात सहभागी होऊन श्रींच्या दर्शनाचा आणि गोंधळ विधी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मसुरे डागमोडे येथील समस्त ठाकूर मंडळींकडून करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स