ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नगराध्यक्षांच्या पाठपुराव्याने जेष्ठ नागरिकांसाठी कणकवलीत १००कोव्हीड लस डोस

नगराध्यक्षांच्या पाठपुराव्याने जेष्ठ नागरिकांसाठी कणकवलीत १००कोव्हीड लस डोस

प्रकाशन: 17 Aug 2021 03:59 PM
वाचन संख्या 62

आमदार नितेश राणेंनी जेष्ठ नागरिकांची मागणी केली पूर्ण

कणकवली | उमेश परब : कोरोना लसीकरणसाठी जेष्ठ नागरिकांसाठी वेगळे डोस ठेवावेत अशी मागणी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यामाध्यमातून आमदार नितेश राणे यांच्याकडे केली होती. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केलेल्या पाठपुराव्याने या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार नितेश राणे यांनी जेष्ठ नागरिकांसाठी कणकवलीत सेपरेट १००डोस उपलब्ध करून दिले आहेत. आज १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लसीकरण मध्ये कणकवली कॉलेज च्या इमारतीत जेष्ठ नागरिकांना १०० डोस वेगळे ठेवण्यात आले आहेत. सध्या कोव्हीड लसीकरणाचे महत्व कळू लागल्यामुळे नागरिकांचा लस टोचून घेण्याकडे वाढता कल आहे. लस कमी आणि लाभार्थी जास्त असे चित्र प्रत्येक लसीकरण केंद्रावर असून उपलब्ध डोस संपल्यानंतर उर्वरित नागरिकांना माघारी परतावे लागते. हा त्रास जेष्ठ नागरिकांनाही होतो. रांगेत तिष्ठत राहूनही डोस न मिळताच जेष्ठ नागरिकांना घरी यावे लागते. यावर उपाय म्हणून जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय म्हणून वेगळा कोटा ठेवण्याची मागणी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी केली होती. नगराध्यक्ष नलावडे यांनी ही बाब आमदार नितेश राणेंच्या कानावर घालताच तात्काळ आमदार नितेश यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्याशी चर्चा करून जेष्ठ नागरिकांसाठी विशेष कोटा ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज कणकवली कॉलेजमध्ये होत असलेल्या लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिकांसाठी १०० डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. याचा लाभ घेत जेष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादा कुडतरकर यांनी केले आहे. जेष्ठ नागरिकांसाठी कोव्हीड लस चा विशेष राखीव कोटा ठेवल्याबद्दल आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स