आमदार नितेश राणे साहेब यांच्या स्वनिधीतून ऍम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा संपन्न.
वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे मेहबूबनगर च्या युवा पिढीची सातत्याने ऍम्ब्युलन्स ची मागणी होती . त्यांच्या या मागणीला आमदार नितेशजी राणे यांनी होकार देत मेहबूबनगर वासियांना तसेच उंबर्डे दशक्रोशीतील ग्रामस्थांना रुग्णवाहिकेची अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन दिली.
या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा रविवारी दिनांक http://localhost/news/public/uploads/20 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजी रजा स्पोर्ट्स आयोजित बक्षिस वितरण समारंभाच्या दरम्यान पार पडला.
या समारंभाचे उदघाटन तसेच लोकार्पण,समारंभाचे अध्यक्ष तथा भाजप चे तालुकाध्यक्ष नासिर भाई काझी तर प्रमुख उपस्थिती भालचंद्र साठे यांच्या शुभ हस्ते झाले .
नासिर भाई काझी आपल्या भाषणात म्हटले की मेहबूबनगर च्या युवा पिढीच्या मागणी नुसार आमदार साहेबांनी ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करुन दिली तसेच ही सेवा संपूर्ण उंबर्डे दशक्रोशीतील लोकांना मिळावी हाच याचा हेतू आहे.
भालचंद्र साठे यांनी देखील ही सेवा अविरत चालू ठेऊन लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर रहा असे आवाहन युवा पिढीला केले.
या समारंभास युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, युवा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, ग्रामपंचायत सदस्य रज्जब रमदूल, चेअरमन उमर रमदूल,हाजी अब्दुल नाचरे, दस्तगीर रमदुल, अस्लम बोबडे, करीम पाटणकर, नासिर सारंग, रमजान रमदुल, महमद रमदूल, हाजी सय्यद नाचरे,हसन रमदूल, हसन नाचरे, अ. रहीमान पाटणकर, आदम बोबडे, अब्दुल बोबडे, शिराज रमदूल,सय्यद थोडगे, शाबान राऊत, प्रसाद पांचाळ, समीर लांजेकर, रेहान स्पोर्ट्स, जुबेर नाचरे,पाकीजा स्पोर्ट्स,रझा स्पोर्ट्स चे सर्व खेळाडू, जिल्ह्यातील नामवंत खेळाडू व तमाम ग्रामस्थ उपस्थित होते.
पाहुण्यांचे आभार रज्जब रमदूल यांनी तर सूत्र संचालन कादिर फरास यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)