ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कळसुली मार्गावर अपघात ; सख्ख्या बहिणी गंभीर जखमी..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कळसुली मार्गावर अपघात ; सख्ख्या बहिणी गंभीर जखमी..!

प्रकाशन: 22 Mar 2022 12:25 PM
वाचन संख्या 182

कणकवली | उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : कळसुली ते कणकवली या मार्गावर शिरवल येथे रिक्षा पलटी होऊन दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. डंपरने हूल दिल्याने हा अपघात झाल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.


कळसुली – गागोसखल येथुन कणकवलीत रिक्षेने येत असताना समोरून येणाऱ्या डंपरने हुल दिल्यामुळे रिक्षा बाजूला घेताना रिक्षा पलटी होत यात कळसुली येथील दोन सख्या बहिणी नम्रता घाडीगावकर व निकिता घाडीगावकर या गंभीर जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी सकाळी ८ वा. च्या दरम्यान शिरवल मध्ये कळसुली रस्त्यावर घडला. अपघातानंतर रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने अधिक उपचाराकरता त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी मदत कार्यासाठी धाव घेतली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री वागदे माजी सरपंच संदीप सावंत, सुशात दळवी यांच्यासह ग्रामस्थ उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स