ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पारंपरिक मच्छीमार संघटना तारकर्ली यांच्या वतीने श्री.बाबा मोंडकर यांचा सत्कार.

पारंपरिक मच्छीमार संघटना तारकर्ली यांच्या वतीने श्री.बाबा मोंडकर यांचा सत्कार.

प्रकाशन: 22 Mar 2022 01:55 PM
वाचन संख्या 118

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील नरेश कांदळगावकर रापण संघ ,केळुसकर रापण संघ,कुबल रापण संघ, भाली देऊलकर रापण संघ या रापण संघानी विक्रांत मच्छीमार संस्थेचे चेअरमन अध्यक्ष म बाबा मोंडकर यांनी रापण सभासदांची कागदपत्रांची पूर्तता लवकर करून लवकर आर्थिक मदत मिळण्यास प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचा स्मृतीचिन्ह ,शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

रापण संघाचे सदस्य गुंडू कांदळगावकर,सुरेंद्र केळुसकर,महादेव देऊलकर ,प्रकाश खराडे डीगू मालंडकर यांनी हा गौरव केला.

सुरेश बापार्डेकर यांनी रापण सभासद मच्छीमारांना क्यार व महा चक्रीवादळामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आलेली नसल्याने विशेष आर्थिक सहाय्य मंजूर होऊनही वाटप करण्यास टाळाटाळ लक्षात घेऊन मदत केली.

अखिल भारतीय मच्छीमार गाबित समाज महासंघ यांनी लवकर मदत देण्याकरिता शासन दरबारी आणि फिशरिज ऑफिस येथे पत्रव्यवहार पाठपुरावा लवकर देण्यास प्रयत्न केले .तसेच आर्थिक मदत मिळावी याकरिता पत्रव्यवहार पाठपुरावा करून मिळवून दिल्याबद्दल श्री.सुरेश बापर्डेकर यांचाही पुष्पगुच्छ देऊन वंदन केरकर यांच्या हस्ते सत्कार केला तर श्री.नंदकुमार सावंत यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी मोंडकर यांनी आपल्या भाषणात सरकारी योजना, किसान कार्ड बाबत सर्वांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. बऱ्याच सबसिडी योजना आहेत त्या रापण संघ ,रापणकर आणि मच्छीमारांनी याचा फायदा घ्यावा असेही ते म्हणाले.

हा सत्कार कार्यक्रम श्री महापुरूष मंदिर तारकर्ली येथे पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन खराडे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स