एस.एमच्या माजी विद्यार्थ्यांचा कुणकेश्वर येथे स्नेहमेळावा.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : एस एम हायस्कूल कणकवलीची १९७६ ची दहावीची बॅच….व्हाटसग्रुप आहे,फोनवरून बोलणे होत असते,पण प्रत्यक्षात भेट म्हणजे स्वर्गीय आनंदच.तोच अविस्मरणीय क्षण कुणकेश्वरच्या भूमीत या माजी विध्यार्थ्यांनी अनुभवला. माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी केव्हाच आज्जी-आजोबा झालेले आहेत परंतु प्रत्यक्ष मित्र-मैत्रिणींची भेट होताच वय क्षणात कमी झाले आणि१९७६च्या आठवणींना उजाळा मिळाला.
२००९साली ३३ वर्षांनी एकत्र आलेले हे मित्र पुन्हा १२वर्षांनी स्नेहमेळ्याच्या निमित्ताने एकत्र आले होते. ४६वर्षांचे कणकवली येथील एस्. एम्.हायस्कूलच्या सन १९७६च्या दहावीच्या माजी विद्यर्थ्यांचे हे अतुट नाते त्यांच्या आत्मविश्वासाने प्रेमबंधनात-स्नेहात टीकुन आहे हे विशेष.एकत्र आल्यानंतर प्रत्येकाच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली गेली.जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.त्याकाळातील मौज,मजा,मस्ती पुन्हा अनुभवली.माणूस म्हणून जगत असताना हे क्षण विस्मरणात गेले असते तर,आयुष्यात काहीतरी गमावल्यासारख वाटल असत.पण हे अनमोल क्षण अनुभविण्याची संधी दिली ते माजी विद्यार्थी व उद्योजक मित्र नंदु आळवे आणि संजय पाध्ये यांच्या मुळे.त्यांनी हा स्नेहमेळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. जनजागृती सेवा समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष माजी विद्यर्थ्यींनींना वर्गमित्र तथा माजी आमदार राजन तेली व माजी जिल्हा परिषद सदस्य सतिश नाडकर्णी यांच्या हस्ते”सन्मानपत्र”प्रदान करुन गौरवांकीत करण्यात आले.स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यस्त असतो,घडाळ्याच्या काट्यानुसार कामाचे तास ठरविणा-या लोकांना सगयासोयऱ्या कडे लक्ष द्यायला वेळ नसतो,पण या धकाधकीच्या जीवनातही वेळात वेळ काढून एकत्र येऊन सुखदुःखांची देवाणघेवाण करुन चार क्षण आनंदात घालविण्याचा हा पायंडा आदर्शवतच आहे.दोन दिवस संपन्न झालेल्या या स्नेहमेळ्याचे सुत्रसंचालन माजी विद्यार्थी भरत तोरसकर यांनी केले.व आभार प्रदर्शन माजी विद्यार्थीनी सौ.रजनी चिंचळकर-पाध्ये हिने केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)