सडूरे रावराणेवाडी येथे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी.
वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील सडूरे येथे दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येते. या पार्श्वभूमीवर या वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे होणारी जयंती सडुरे रावराणेवाडी येथे साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजक अरुण रावराणे, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामसेवक प्रशांत जाधव, सुभाष रावराणे, जयवंत रावराणे संभाजी रावराणे,केशव रावराणे, अनुज कुमार रावराणे, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)