|| सिंधुदिनांक ||
२१ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –
इ.स. १५५६ साली ख्रिश्चन धर्मात सुधारणा करणे गरजेचे आहे असे सांगितल्या प्रकरणी आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.
इ.स. १६८० साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्यातील कुलाबा किल्ल्याची बांधणी सुरु केली.
सन १८३६ साली कोलकाता येथील राष्ट्रीय लायब्ररी( वाचनालय) नावाने प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक पुस्तकालयाची स्थापना करण्यात आली.
सन १८५८ साली इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई राहत असलेल्या किल्ल्याला वेढा दिला होता.
सन १८८७ साली मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली.
सन १९७५ साली सर्वप्रथम राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून कलम ३५२ अंतर्गत मध्यरात्री आणीबाणी जाहीर केली होती. सन १९७७ साली भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
सन १९८० साली अमेरिकेने रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित ऑलम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला होता.
सन १९९० साली नामिबिया राष्ट्राला दक्षिण आफ्रिका राष्ट्रापासून स्वातंत्र्य करण्यात आले.
सन २००६ साली जॅक डोर्सी, नोहा ग्लास, इव्हान विल्यम्स व बिज स्टोन यांनी एकत्रितपणे अमेरिकन मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग सेवा ट्विटर ची स्थापना केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)