हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवलीतर्फे २ एप्रिलला स्वागतयात्रा
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली तर्फे आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा २०२२ शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत संपन्न होणार आहे .
स्वागतयात्रा प्रारंभ कणकवली पंचायत समिती जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वाजत गाजत पटवर्धन चौकात येईल व बाजारपेठेतून ढालकाठी मार्गे विद्यामंदिरच्या पटांगणावरील शिवारा मंदिर येथे समारोप होणार आहे.
नववर्षाचे स्वागत पारंपारिक पद्धतीने करण्यासाठी पारंपारिक वस्त्रे लेवून उत्साहाने स्वागत यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी१)भारत माता वेशभूषेचा रथ / बैलगाडी ,२) ध्वजपथक ( ओम असलेले भगवे झेंडे ) ३) लेझीम पथक ४ ) ढोल पथक ५ ) नागरीक संचलन ६ ) दुचाकी पथक ७ ) वारकरी दिंडी ८ ) भारतातील हिंदू संस्कृतीतील पारंपारिक वेषभूषेतील हिंदू धर्माभिमानी यांचा सहभाग असे यात्रेचे स्वरूप राहणार आहेथ.अधिक माहितीसाठी सुमनराज ट्रेड सेंटर,मधुबन लॉज जवळ , , पेट्रोलपंप समोर , कणकवली
संपर्क क्रमांक – ९८६०३०४२२४, ७९७२७७३८३१ , ९४२०२६१७६३ येथे संपर्क साधावा असे आवाहन हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)