ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
डेगवे-आंबेखणवाडीच्या ब्राह्मणीस्थळात  धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

डेगवे-आंबेखणवाडीच्या ब्राह्मणीस्थळात धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रकाशन: 20 Mar 2022 05:30 PM
वाचन संख्या 133

बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे -आंबेखणवाडीच्या श्री ब्राह्मणीस्थळात गुरूवार रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सकाळी ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता; श्री स्थापेश्वर ,महालक्ष्मी देवतांना डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस व ग्रंथमित्र उल्हास देसाई यांनी पुष्पहार अर्पण केले व विविध धार्मिक कार्यक्रम व त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित केली होती.

डेगवे आंबेखणवाडी येथे सार्वजनिक श्री ब्राह्मणीस्थळ आहे.या स्थळात आंबेखणवाडीचे ग्रामस्थ प्रतिवर्षी श्री ब्राह्मणभोजन,श्री सत्यनारायणाची महापुजा,श्रावण महिन्यात सप्त सोमवारचे व्रत करणे,त्यानंतर ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवता,श्री स्थापेश्वर महालक्ष्मी देवता तसेच श्री ब्राह्मणीस्थळात अभिषेक करणे .शिवाय इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात.हि पंरपरा फार पुर्वजापासून म्हणजे अंदाजे सव्वाशे वर्षांपासून सुरू आहे

Article image

अलीकडेच सदर.परीसराच्या जिर्णोध्दाराचे काम ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागातून पुर्ण केले आहे.त्यामुळे जिर्णोध्दारा निमित्ताने श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन केले होते. त्या निमित्ताने भाविकांनी तिर्थ प्रसादाचा व रात्री महाप्रसादाचा,लाभ घेतला .रात्री महिला भजन मंडळ बांदा देऊळ वाडी,श्री स्थापेश्वर भजन मंडळ,डेगवे जांभळवाडी तसेच श्री ब्राह्मणी भजन मंडळ,आंबेखणवाडी यांचा भजनाचा, कार्यक्रम संपन्न झाला.मुलांचे विविध कार्यक्रम झाले.विद्युत रोषणाईने ;व रांगोळीने परीसर सुशोभित केला होता.गावातील ग्रामस्थांनी व मान्यवरांनी ,माहेरवाशीणीनी हितचिंतक भाविकांनी दर्शन घेतले.

Article image

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री उल्हास देसाई, मंगलदास देसाई, वामन देसाई,शामसुंदर देसाई, सदानंद देसाई , विजय देसाई, अमृत देसाई, गोपाळ देसाई, हेमंत देसाई,मोहन देसाई, दिपक देसाई योगेश मांजरेकर ,अमिषा देसाई,तन्वी देसाई,तेजश्री देसाई व महिला व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले . असे स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा राज्यस्तरीय ग्रंथमित्र श्री उल्हास देसाई यांनी कळविले आहे.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स