ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त  पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत ३०० रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत ३०० रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

प्रकाशन: 19 Mar 2022 03:30 PM
वाचन संख्या 72

२६ मार्चला पूर्व तपासणीचा मालवण ग्रामीण रुग्णालय येथे शुभारंभ

८, ९ व १० एप्रिल रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ):कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यामार्फत प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. २६ मार्च २०२२ रोजी पासून मोतीबिंदू पूर्व तपासणी होणार असून याचा शुभारंभ मालवण ग्रामीण रुग्णालय येथे होणार आहे. डॉ. तात्याराव लहाने, जे. जे. हॉस्पिटल मुंबईच्या नेत्र शल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. राघिनी पारेख यांच्यासह इतर १५ तज्ज्ञ डॉक्टरांकडून ३०० रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज ओरोस येथे ८, ९ व १० एप्रिल २०२२ रोजी करण्यात येणार आहे. प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ असलेले डॉ. तात्याराव लहाने यांनी आतापर्यंत ५८७ शिबिरांमध्ये दीड लाखाहून अधिक मोतीबिंदू व डोळ्यांसंबंधित शस्त्रक्रिया केल्या आहे. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत होत असलेला सिंधुदुर्गातील हा पहिला कॅम्प आहे. प्राथमिक तपासणी मध्ये ज्यांना मोतीबिंदू आढळेल त्यांच्यावर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे त्याचबरोबरच रुग्णांना लागणारी लेन्स व दोन प्रकारचे चष्मे मोफत दिले जाणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणीची केंद्रे व तारखा खालीलप्रमाणे असतील. शनिवार २६ मार्च २०२२ रोजी मालवण ग्रामीण रुग्णालय.सोमवार २८ मार्च आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र.बुधवार ३० मार्च मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र.गुरुवार ३१ मार्च हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र. शुक्रवार ०१ एप्रिल वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र.सोमवार ०४ एप्रिल पणदूर व कडावल प्राथमिक आरोग्य केंद्र.बुधवार ०६ एप्रिल माणगांव व हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रगुरुवार ०७ एप्रिल नेरूर प्राथमिक आरोग्य केंद्र. याठिकाणी सकाळी १० ते दुपारी ०१ वाजेपर्यंत नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी होणार असून कुडाळ मालवण तालुक्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. तात्याराव लहाने यांनी केले आहे.त्यासंदर्भात डॉ. तात्याराव लहाने यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज ओरोस येथे काल भेट देऊन या शिबिराच्या नियोजनाबाबत बैठक घेत चर्चा केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांच्यासमवेतही डॉ. तात्याराव लहाने यांची बैठक संपन्न झाली. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एस. मोरे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जि. प. गटनेते नागेंद्र परब, डॉ जोशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे, नागेश ओरोसकर, हेदूळ सरपंच नंदू गावडे, कुंदे सरपंच सचिन कदम,ओरोस सरपंच सौ मंगल देसाई , परशुराम परब,बंडू चव्हाण ,राजेश गांवकर, राजू गवंडे, रवी कदम आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स