ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सुप्रसिद्ध कवी विनय सौदागर यांच्या 'सभोवताल' काव्यसंग्रहाचे उद्या प्रकाशन.

सुप्रसिद्ध कवी विनय सौदागर यांच्या 'सभोवताल' काव्यसंग्रहाचे उद्या प्रकाशन.

प्रकाशन: 19 Mar 2022 09:53 AM
वाचन संख्या 58

सौदागरांच्या तिसर्या पुस्तकाची काव्यप्रेमींमध्ये उत्कंठा..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी विनय सौदागर यांच्या ‘सभोवताल’ या मालवणी भाषेतील काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आजगांवात श्री.सौदागर यांच्या निवासस्थानी आयोजित केला आहे.

उद्या रविवार http://localhost/news/public/uploads/20 मार्चला सायंकाळी 5 वाजता एका छोटेखानी कार्यक्रमात हे काव्यसंग्रह तथा पुस्तक प्रकाशित होणार आहे.

सौदागर यांचे हे तिसरे पुस्तक आहे. ‘भोवताल’ या पहिल्याच काव्यसंग्रहाला भरपूर प्रतिसाद लाभल्याने आता मालवणी भाषेतील हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे.

या प्रकाशन समारंभात सभोवताल काव्यसंग्रहाचे प्रकाशन श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालय, म्हापसा-गोवाचे प्राचार्य व साहित्य संगम,मांद्रे-गोवा संस्थेचे कार्यवाह गजानन मांद्रेकर यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शासकीय विद्यालय तोरसे चे सहाय्यक शिक्षक व साहित्य संगम, मांद्रे या संस्थेचे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर याना निमंत्रित केलेय, तर विशेष अतिथी म्हणून पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त व प्रसिद्ध कवी सुधाकर ठाकूर उपस्थित रहाणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स