ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कासार्डे येथे जिल्हा बांधकाम कामगार महासंघाची गांवभेट सभा संपन्न..!

कासार्डे येथे जिल्हा बांधकाम कामगार महासंघाची गांवभेट सभा संपन्न..!

प्रकाशन: 17 Mar 2022 07:44 PM
वाचन संख्या 40

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या जिल्हा बांधकाम कामगार महासंघाची कार्यकर्ता गावभेट या अंतर्गत कासार्डे पंचक्रोशीत सभा आयोजित करण्यात आली होती.

15 मार्च रोजी संपन्न झालेल्या या सभेत प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय मजदूर संघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोषाध्यक्ष श्री सुधीरजी ठाकूर होते तर भा.म.संघ सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सत्यविजय जाधव ,जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र आरेकर ,जिल्हा सदस्य विकास चाळके उपस्थीत होते.

सभेची आरंभ जोरदार घोषणा देत झाला . त्यानंतर श्रमिक गीत गात सभेला सुरुवात झाली.त्याचबरोबर उपस्थीत सर्व सभासद कार्यत्यानी मान्यवरांचे स्वागत केले. सभेची रुपरेषा ओमकार गुरव यांनी स्पष्ट केली.

सभेमध्ये मंडळाच्या लाभांची माहिती आरेकर यांनी दिली तर भारतीय मजदूर संघाची ओळख व भारतीय मजदूर संघ संलग्न बांधकाम कामगार महासंघ हे नेमके काय आहे हे सांगत २५ मिनिटे अन्य मुद्यांवर ठाकूर साहेब यांनी मार्गदर्शन केले.त्याच बरोबर शेवटी श्री जाधव यांनी अध्यक्षीय भाषण केले. कु.ओमकार गुरव यांनी सर्वांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स