भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले भाजपतर्फे ६४ ई - श्रम कार्डचे वितरण.
चिंदर | विवेक परब : भाजपा वेंगुर्लेच्यावतीने प्रदेश चिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील ६४ पुरुष व महिलांना मोफत ई – श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले.
तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुरवातीला निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्या हातून जनतेची सेवा होण्यासाठी लवकरात लवकर आमदार होवोत अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप , जि.प.सदस्य प्रीतेश राऊ , जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल – बाळा सावंत, उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर, नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे, नगरसेविका श्रेया मयेकर – कृपा मोंडकर – पुनम जाधव, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.चिटणीस नितिन चव्हाण, ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, महिला जि. सरचिटणीस सारीका काळसेकर, शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर – जगंन्नाथ राणे, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर व वामन गावडे, युवा मोर्चा चे भूषण सारंग, विभागीय अध्यक्ष अमित गावडे , अनुसुचीत जाती मोर्चा चे गुरुप्रसाद चव्हाण, वजराठ उपसरपंच नितीन परब, महिला मोर्चाच्या वृंदा मोर्डेकर , रसीका मठकर , आकांक्षा परब, ज्ञानेश्वर केळजी तसेच तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)