ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
फसवणूक झाल्यास ग्राहकांनी आपले हक्क,अधिकार व सोबतच कर्तव्याचे पालन करावे : प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे

फसवणूक झाल्यास ग्राहकांनी आपले हक्क,अधिकार व सोबतच कर्तव्याचे पालन करावे : प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे

प्रकाशन: 17 Mar 2022 10:03 PM
वाचन संख्या 112

वैभववाडी | नवलराज काळे : “ग्राहक हा राजा आहे. ग्राहक म्हणून कोठेही फसवणूक झाल्यास गप्प न बसता योग्य ठिकाणी तक्रार करून न्याय मिळवला पाहिजे. ग्राहकांसाठी स्वतंत्र असलेला ग्राहक संरक्षण कायदा त्याचबरोबर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून ग्राहक प्रबोधनाचे कार्य सुरू आहे. ग्राहक म्हणून आपले हक्क आणि अधिकार त्याचबरोबर कर्तव्य याचे पालन सर्वांनीच केले पाहिजे”, असे प्रतिपादन वैभववाडीतील ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ कार्यक्रमातील अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे यांनी केले.


आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशन आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ मार्च ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील उपप्राचार्य प्रा.ए.एम कांबळे, कॉमर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.आर.बी. पाटील, डॉ.एम.आय कुंभार व प्रा.श्री.आर.एम.गुलदे उपस्थित होते. ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

२४ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ आणि १५ मार्च हा ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिनांचा केंद्रबिंदू हा ग्राहक असून ग्राहकांचे प्रबोधन हा यामागील प्रमुख उद्देश आहे. ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ग्राहक चळवळ, भारतातील ग्राहक चळवळ, ग्राहक चळवळीची गरज आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्य याबाबत प्रमुख वक्ते प्रा.एस.एन. पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.


आपण खरेदी दरम्यान निव्वळ गि-हाईक न बनता ग्राहक बनावे असे त्यांनी आवाहन केले. आपण वस्तू खरेदी करताना सजगता बाळगली पाहिजे. खरेदी अगर आर्थिक व्यवहार करताना ओळख आणि मैत्री बाजूला ठेवून व्यवहार केला पाहिजे याबाबत प्रा.आर.एम.गुलदे यांनी उदाहरण उदाहरणासह माहिती दिली. प्रत्येक व्यक्ती ग्राहक असून जीवनामध्ये सजगता महत्त्वाची आहे. ग्राहक संरक्षण कायदा-२०१९ सर्वांनी समजून घेऊन तो आचरणामध्ये आणला पाहिजे असे प्रा.श्री.ए.एम. कांबळे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एम.आय.कुंभार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.राहूल भोसले यांनी माडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. संजीवनी पाटील यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स