ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे तर्फे मराठा सुभेदार महाराजा मल्हारराव होळकर यांची जयंती झाली साजरी..!

ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे तर्फे मराठा सुभेदार महाराजा मल्हारराव होळकर यांची जयंती झाली साजरी..!

प्रकाशन: 17 Mar 2022 01:15 PM
वाचन संख्या 66

जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व वयोगटातील महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर

वैभववाडी | प्रतिनिधी : मराठा साम्राज्याचे सुभेदार महाराजा मल्हारराव होळकर यांची 329 वी जयंती ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे मध्ये साजरी करण्यात आली. इंग्रजांशी पहिला लढणारा महाराजा सुभेदार मल्हारराव होळकर यांना अभिवादन करत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज विजयसिंह काळे यांनी सुभेदार होळकर यांच्याविषयी माहिती व विचार उपस्थितांसमोर कथन केले. जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व वयोगटातील महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी गावचे सरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, विजय रावराणे, ग्रामसेवक प्रशांत जाधव, सागर मेजारी, रमाकांत रावराणे, सुभाष राणे, कृषी सहाय्यक विश्वजीत पाटील, तलाठी अक्षय लोणकर, अंगणवाडी सेविका सरिता पाटील, सौ. सावंत, जन कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किशोर जैतापकर, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय जंगम, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, रूपाली रावराणे व रामचंद्र आडुळकर, दीपक भावे गावचे कोतवाल मोहन जंगम, संतोष भोसले, वैशाली रावराणे आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स