ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
माजी सभापती श्री.मधुकर सावंत यांना आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार.

माजी सभापती श्री.मधुकर सावंत यांना आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार.

प्रकाशन: 15 Mar 2022 08:20 PM
वाचन संख्या 75

कै.दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा सन्मान पुरस्कार.

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : शिवजयंती उत्सव मंडळ, हळवल यांच्या वतीने गेली १३ वर्षे कै.दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण यांच्या स्मरणार्थ आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार देऊन तालुक्यातील एका व्यक्तीचा सन्मान केला जातो . यावर्षी हा पुरस्कार कणकवलीचे माजी सभापती मा. मधुकर सावंत यांना मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आला.

हळवल शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने गेली ३३ वर्षे मोठ्या उत्साहात तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते.यावर्षीही हा पुरस्कार सोमवार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी आमदार वैभव नाईक, मा.जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे.

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री.राजू राणे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स