ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नट वाचनालय बांदा मध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नट वाचनालय बांदा मध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 10 Mar 2022 10:25 PM
वाचन संख्या 51

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा येथील नट वाचनालयात शनिवार दि. २६ रोजी सकाळी १०.३० चाजता अंकुश रामचंद्र माजगांवकर व परिवार पुरस्कृत (कै.) परशुराम लाडू नाईक व (कै.)लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांचे स्मरणार्थ ” निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ही स्पर्धा दोन शालेय गटात होणार आहे.


पहिला गट इ . ५ वी ते ७ वी व दुसरा गट इ . ८ वी ते १० वी असा आहे .
पहिल्या गटासाठी “माझी आई” व “माझा आवडता खेळ” असा विषय आहे. वेळ १ तास राहील व शब्दमर्यादा ५०० शब्द आहे. दुसऱ्या गटासाठी “कोरोनाचा मानवी जीवनावर झालेला परिणाम” व “आजच्या युध्दाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम” असे विषय ठेवण्यात आले आहेत. वेळ- १ तास राहील व शब्दमर्यादा – ७०० शब्द आहे. दोन्ही गटातील स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहावयाचा आहे. ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित आहे. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील फक्त पाच विद्यार्थी स्विकारले जातील .

ही स्पर्धा वाचनालयात होणार आहे . दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल . स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नावे वाचनालयात दि . २२ मार्च २०२२ पर्यंत नोंदवावीत असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स