ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मडुरे डिगवाडीत शॉर्टसर्किटमुळे उडाली आगीची ठिणगी...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मडुरे डिगवाडीत शॉर्टसर्किटमुळे उडाली आगीची ठिणगी...!

प्रकाशन: 10 Mar 2022 09:42 PM
वाचन संख्या 91

महावितरण कर्मचारी होते नाॅट रिचेबल…! ग्रामस्थांच्या तत्परतेने टळला अनर्थ ….!

बांदा | राकेश परब : मडूरा – डिगवाडी येथे हायस्कूल नजीक शॉर्टसर्किटमुळे बागायतीला आग लागली. वाचनालयाच्या ग्रंथपाल नेहा सामंत यांनी तातडीने ग्रामस्थांना आगीची कल्पना दिली. ग्रामस्थ प्रकाश वालावलकर, उत्तम वालावलकर यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आज सायंकाळी 4 च्या सुमाराला ही घटना घडली.

महावितरणच्या कर्मचार्‍यांना घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला असता नॉट रिचेबल असल्याचे प्रकाश वालावलकर यांनी सांगितले.


मडुरा परिसरात शॉर्टसर्किटमुळे काजू बागायतींना दरवर्षी आग लागण्याचे प्रकार घडतात. ११ केव्हीच्या विद्युततारा ठिकठिकाणी झाडांना घासत असल्याने स्पार्किंग होऊन आग लागण्याचे प्रकार होतात. महावितरणचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने असे प्रकार वारंवार होत असतात. याबाबत सावंतवाडी तहसीलदारांनी लक्ष घालावे व महावितरणच्या अधिकार्‍यांना आदेश देण्याची मागणी प्रकाश वालावलकर यांनी केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स