ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
महिलांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे : अभिनेत्री सौ अक्षता कांबळी
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

महिलांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे : अभिनेत्री सौ अक्षता कांबळी

प्रकाशन: 10 Mar 2022 01:04 PM
वाचन संख्या 141

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : कणकवली येथील सहयोगिनी सेवा मंडळाचा महिला दिन कार्यक्रम 9 मार्च रोजी उत्साहात साजरा झाला. यावेळी अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत, सौ नीलम •पालव, सौ रोजा खडपकर, मा. कमल ताई परुळेकर यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कष्टकरी घरेलू कामगार महिला यांचा सत्कार करण्यात आला.

मंडळाच्या अध्यक्ष सौ दीपा सरूडकर, उपाध्यक्ष सौ स्वाती पोएकर, सचिव सौ शुभांगी उबाळे तसेच मंडळाच्या सर्व पदाधिकारी सदस्या यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

यावेळी बोलताना मराठी व बाॅलिवुड सिने अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी महिलांना स्वतःची ओळख शोधून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायचा जीवन मार्गदर्शक मंत्र दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु ऋतुजा कुदळे यांनी केले.

महिलांचे मनोरंजनाचे कार्यक्रम, फनिगेम,संगीत खुर्ची असे विविध कार्यक्रम यावेळी करण्यात आले. फनी गेम्स मध्ये प्रथम क्रमांक प्रिया मालंडकर, द्वितीय संजना चव्हाण तर तृतीय गीतांजली मालंडकर यांनी पटकावला, त्याच बरोबर दिव्यांग मुलगी प्रिया सावंत हिचे नृत्य सादरीकरण हे महिलांना प्रेरणा देणारे ठरले.

शेवटी मंडळाच्या अध्यक्ष सौ दीपा सरूडकर यांनी सर्व महिलांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स