ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
इन्सुली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ गावठण मध्ये महिला दिन कार्यक्रम संपन्न
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

इन्सुली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ गावठण मध्ये महिला दिन कार्यक्रम संपन्न

प्रकाशन: 09 Mar 2022 11:32 PM
वाचन संख्या 44

बांदा | राकेश परब : संपूर्ण कुटुंबाची काळजी करण्याचे काम महिला करत असतात. मात्र ते करत असताना मात्र आपल्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. असे न करता आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. आपले नाव स्वकर्तृत्वाने समाजात निर्माण केले पाहिजे. आपल्यासाठी प्रत्येक क्षेत्र खुले आहे, म्हणूनच पुढे या आणि स्वतःला सिद्ध करा असे प्रतिपादन सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती मानसी धुरी यांनी केले.त्या इन्सुली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 गावठण मध्ये महिला दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.

यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाच्या ग्रामपंचायत सदस्या आरती परब, अध्यक्षा श्रुती नाईक, डॉ अर्चना सावंत, पोलीस कर्मचारी सिद्धी गावडे, अदिती पालव, वैदही परब, कृतिका जाधव, मुख्याध्यापक पेडणेकर, आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित महिलांना डॉ अर्चना सावंत यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना डॉ अर्चना सावंत म्हणाल्या, प्रत्येक दिवस महिलांचाच असतो असे समजून आपण आनंदी राहा. आपण कुटुंबाची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. तरच आपलं आरोग्य चांगलं राहील. तुम्ही चांगले आरोग्य ठेवलात तर तुमचे कुटुंब चांगले राहील असे त्या म्हणाल्या.

यावेळी आरती परब, पोलीस कर्मचारी सिद्धी गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका करमळकर यांनी तर आभारी कविता घुडे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स