ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवगडची शान-डॉ.सोनाली तेली हिचा महिलादिनी सत्कार
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

देवगडची शान-डॉ.सोनाली तेली हिचा महिलादिनी सत्कार

प्रकाशन: 08 Mar 2022 11:02 PM
वाचन संख्या 710

शिरगाव/संतोष साळसकर : आंतरराष्ट्रीय मानवी हक्क राजदूत संघटना शाखा देवगड तालुक्याच्यावतीने जागतिक महिला महिलादिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील मोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रथम वर्ग वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली तुकाराम तेली यांचा संघटनेच्या देवगड तालुका महिलाध्यक्षा सौ.दीक्षा तेली यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावच्या सुकन्या डॉ.सोनाली तुकाराम तेली यांनी वैद्यकीय क्षेत्रात परदेशात रशियामधून एमबीबीएस म्हणून उच्चशिक्षण घेऊन पुन्हा मायदेशी देवगड ग्रामीण रुग्णालयात त्यांनी कोरोना काळात रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा केली.डॉ.सोनाली तेली यांनी रशियामध्ये ६ वर्षे, दिल्लीमध्ये २ वर्षे वैद्यकीय शिक्षण घेतले.त्यांचे वडील तुकाराम तेली हे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष आहेत.

त्याच्या मातोश्री सौ.शुभांगी तेली या अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गटामध्ये सक्रिय आहेत.घरचे वातावरण सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित असल्यामुळे डॉ.सोनाली तेली यांना आपण वैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत राहून आपल्या लोकांची सेवा करायची या चांगल्या उदेशाने त्यांनी आपल्या मातृभूमीत देवगड ग्रामीण रुग्णालयात त्यांनी आपल्या सेवेची सुरवात केली.कोरोना काळात तर त्यांनी कोरोना योध्याचे काम करून लोकांना चांगली सुविधा दिली.त्यामुळे त्यांचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा मोंड याठिकाणी यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे देवगड तालुकाध्यक्ष दयानंद तेली,महिला तालुकाध्यक्ष सौ.दीक्षा तेली,उपाध्यक्ष सौ.शुभांगी तेली, तालुका शिक्षण विभाग अध्यक्ष तुकाराम तेली,जेष्ठ पत्रकार दयानंद मांगले, सौ.दीपिका मेस्त्री,कौस्तुभ काळे आदींसह वैद्यकीय कर्मचारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स