ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा

प्रकाशन: 08 Mar 2022 09:54 PM
वाचन संख्या 123

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडीयम प्रशालेत जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रशालेच्या मराठी विभाग व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडला.

हिंदी विभागामार्फत स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी गायलेल्या गाण्यांचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करून घेण्यात आले. त्याचप्रमाणे मराठी विभागामार्फत 8 मार्च महिला दिन निमित्ताने प्रत्येक वर्गाचे समूहगीत सादरीकरण करून घेण्यात आले. प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी सहभाग दर्शवत गीत सादर केले. पालकांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत सौ गायत्री संग्राम प्रभुगावकर यांची पाककृती उल्लेखनीय ठरली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना पौष्टिक पदार्थांचे महत्त्व कळावे यासाठी डॉक्टर वीणा मेहेंदळे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री किशोर देऊलकर यांनी सर्व महिला सदस्यांचा सन्मान केला. रंजनी सावंत, सायली म्हाडगुत, पार्वती कोदे, संजना प्रभुगावकर, रेश्मा बोरकर, स्टेला लोबो, स्वरांजली ठाकूर, सिद्धी सांडव, गौरव तोंडवळकर, संतोषी मांजरेकर या सर्वांचे सहकार्य लाभले. सायली म्हाडगुत व रंजनी सावंत यांनीसूत्रसंचालन ,प्रास्ताविक पार्वती कोदे, आभार संजना प्रभुगावकर यांनी मानले.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स