ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
१४ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरेंच्या हस्ते.

१४ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरेंच्या हस्ते.

प्रकाशन: 05 Mar 2022 01:12 PM
वाचन संख्या 56

चिंदर |‍ विवेक परब : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १४ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरे यांचे हस्ते होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे प्रदेश अध्यक्ष फुलचंद नागटिळक यांनी सांगितले आहे, 9 मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजी विठ्ठल इन सभागृह पंढरपूर येथे संमेलन संपन्न होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ शरद गोरे यांनी मराठीत काव्य भाषांतरीत केला आहे या सह इतर दहा ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे.


रणांगण एक संघर्ष, उष:काल, प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या मराठी चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक केले आहे व संगीत हि दिले आहे आजवर त्यांची महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासावर हजारो व्याख्याने झाली आहेत.
उद्घाटन,परिसंवाद, कथाकथन कविसंमेलन व संमेलनाचा समारोप होणार आहे असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स